प्रतिनिधी – जागतिक वन दिवस 21 मार्चचे औचित्य साधत उंडवडी ता.बारामती या ठिकाणी वनविभागात कृत्रिम पाणवठ्यांवरती वन विभागाची परवानगी घेऊन प्राण्यांना व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय ह्यावी या दृष्टिकोनातून 5000 ली. पाण्याचा टँकर श्री.पांडुरंग रामभाऊ शिपकुले यांच्या मार्फत सोडण्यात आला. (मागील वर्षी 15000 ली. पाणी सोडण्यात आले होते ) या वेळी उपस्थित समिर बनकर (कार्य हीच ओळख फौंडेशन चे अध्यक्ष), कुंभार साहेब, वनरक्षक चौधरी साहेब, विजय गावडे हे उपस्थित होते. तसेच काळे मॅडम(वनअधिकारी), श्री.बाळासाहेब दिवाने, लालासो आटोळे, वैभव हिवरकर, प्रदीप गावडे (साबळेवाडी) यांचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले.