शिवजयंती निमित्त आज व उद्या होणार शस्त्र, नाणी व गडदुर्ग छायाचित्र प्रदर्शन…

प्रतिनिधी- छत्रपती जन्मोत्सव समिती, बारामती आयोजित भव्य शिवकालीन शस्त्रास्त्र, शिवकालीन नाणी आणि गडदुर्ग छायाचित्र प्रदर्शन आज सायंकाळी4 वाजेपासून उद्या रात्री 8 पर्यंत आयोजित केले आहे.
आजवर आपण न पाहिलेले दुर्मिळ शिवकालीन शस्त्र, शिवकालीन नाणी, गडदुर्ग छायाचित्र आपल्याला यामध्ये पाहण्यासाठी मिळतील व एक वेळेस तुम्हाला शिवकाळात गेल्याचा अनुभव झाल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी स्वराज्य उभ करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली हे आपल्याला माहिती मिळणार असून इतिहास कालीन शस्त्रास्त्र, नाणी, गडदुर्ग छायाचित्र संग्रह आणि अभ्यास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, भावी पिढीने यातून आदर्श घेवून राष्ट्राची संपत्ती असणाऱ्या या अनमोल ठेव्याचे जतन- संवर्धन- संरक्षण कार्यात सक्रिय सहभाग द्यावा, या उद्देशाने प्रदर्शन आयोजित केले आहे असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. इतिहास जितका वाचून समजतो तितकाच त्याची साक्ष असणाऱ्या गोष्टी जवळून पाहून इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. तसाच काहीसा शिवकालीन प्रदर्शन पाहून मनाला जानवेल.. याकरता प्रदर्शन याची देही याची डोळा पाहण्यासाठी अवघे अवघे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन शनिवार दिनांक १९ मार्च सायंकाळी ४ वाजलेपासून रविवार दिनांक २० मार्च रात्री ८ पर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान , कसबा बारामती येते संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *