हजारो संघर्षावर मात करून आज हि माता येथे… – उल्लास दादा पवार.

प्रतिनीधी, पुणे. ( वयाच्या 85 ला आयुष्याचे प्रमोशन झाले ,वाड गं माय म्हणत म्हणत दारात भिक्षा मागता मागता सत्याची झोळी खांद्यात घेऊन आज इतपर्यंत पोहचले.येथे प्रत्येक आशु प्रश्न करतात आजुन आम्हाला न्याय देणारा सुर्य उगवला नाही, बहुरूपीच्या खाकीने पळवले आणि या खाकीने संमानित केले…आदर्श माता शेवराई भोसले.)

सारे आयुष्य ऊन, वारा, दुःखाशी बाळगून संघर्ष करून त्यांनी मुलांना निस्वार्थपणे जगने व पैशाविना जगा मानसाला माणुस जोडा असे धडे देत मुलांना घडवले. अशा आदिवासी समाजातील थोर मातेचा सक्षम पोलीस टाईम्स कडून सक्षम महिलारत्न पुरस्कार देऊन आदर्श माता म्हणून सन्मान करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व साहित्यिक उल्लास दादा पवार, माजी आमदार मोहन जोशी, संपादक विलास पाटील, लेखिका सुनिताराजे पवार, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले असे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज्यातील 21आदर्श महिलांचा महिलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्या मातेने आपले सर्व काही सुख त्यागून समाजाच्या हिता साठी वाहून घेतले व मुलांना घडवताना पैशाविना जगा, मानसाला मानुस जोडा या विचाराने देश एक करण्याच्या संकल्पनेतून मुलांना फाटक्या पालात दैनामय आयुष्यात पोटाला पिळोखे घालून 40 गावात भिक्षा मागून आपल्या मुलांना घडवले, अशा आदर्श मातेचा मुलगा आज आदर्श आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले देश सेवेसाठी वाहुन घेतलय, हजारो कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून दिला. हजार शिक्षक प्रवाहात आणले.अशा थोर आदिवासी सेवकाची आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना आदर्श माता म्हणून सन्मानित करण्यात अती आनंद होत आहे असे मत माजी आमदार उल्लासदादा पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,
ज्या पारधी समाजाला चोर दरोडेखोर गुन्हेगार म्हणून पाहीले जात होते, त्याच समाजाचा कलंक पुसून काढला व महाराष्ट्रातील 34 लाख आदिवासी पारधी बांधव एकत्रीत करण्यात शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा फार मोठा वाटा आहे..
सदर या कार्यक्रमात ज्ञानदेव भोसले, पत्रकार निलेश चांदगुडे ,पत्रकार अमर जिजुर्डे, पत्रकार सुनिल भोसले.सचिन भोसले, सुनिल काळे, बलवर पवार, कुणाल भोसले, व उपस्थित महाराष्ट्रातील सर्व सत्कारमूर्ती च्या उपस्थित कार्यक्रम पार पडला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *