बारामती दि.17 :- रेशीम उद्योग हा एक चांगला शेतीपूरक उद्योग असून शासनाकडून या उद्योगाकरीता चांगल्‍या सवलती देण्‍यात आल्‍या असल्‍याने जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना तहसिलदार विजय पाटील यांनी आज दिल्या. महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

ही बैठक श्री. पाटील यांच्या अध्‍यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथील तहसिल कार्यालयात पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष राहुल वाबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जयेश हेडगिरे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डी.के.घुले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मोहन पवार, रेशीम कार्यालय पुणे क्षेत्र सहाय्यक ए.ए.कोकरे, मंडल अधिकारी अमोल जाधव, सदस्य सोमनाथ कदम, संपत सोनवणे, रघुनाथ निकम, संजय चांदगुडे, बाळासाहेब देवकाते, लक्ष्मण जगताप आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्‍ये तहसिलदार श्री. पाटील यांनी तहसिल कार्यालय व पंचायत समिती यांच्यामार्फत महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्‍या रेशीम उद्योग, वैयक्तिक वृक्ष लागवड, रोपवाटिका, फळबाग लागवड, रस्‍ते, ओढा खोलीकरण, घरकुल, सिंचन विहीर, शेळीपालन शेड, वैयक्तिक शोष खड्डा आदी कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याबाबत सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *