मसाला राजमा

भाग – १७ खानाखजाना या आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत मसाला राजमा…

साहित्य – 250 ग्रा. राजमा, 2 कापलेली कांदे, । कप दही, 2 कापलेली हिरवी मिरची, ½ चमचे हळद, ½ चमचे गरम मसाला, 1 चमचे वाटलेले धने, ½ चमचे लाल मिरची वाटलेली, 1 चमचे ताजे क्रिम, 2 मोठे चमचे तेल, 1 जुडी कोथंबीर, 1 चुटकी सोडा, 1 तुकडा कापलेले अदरक, मीठ.

पद्धत – राजम्यास सोडा मिसळलेल्या पाण्यात रात्रभर भिजवा सकाळी याच पाण्यात उकळून घ्या. कढईत तूप गरम करून कांदा फ्राय करून घ्या. नंतर अदरक हिरवी मिरची टाकुन 2 मिनीट भाजा, दहयास घोटुन टाका बरोबरच हळद, वाटलेले धणे, मीठ व लाल मिरची टाकुन द्या. 1 मिनीटानंतर पाण्यासहीत टाकुन द्या आणि हलकेच घोटा. दोन उकळी आल्यानंतर गरम मसाला, क्रीम व कोथंबीर टाकून चालावे व गॅस बंद करून थोडा वेळ झाकुन ठेवा व नंतर साधा भात किंवा फुलक्यांबरोबर खावी.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *