प्रतिनिधी :- दि.28, बारामती नेहमीच राजकीय दृष्ट्या चर्चेत असते. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय सूत्रे ही बारामती मधूनच फिरतात हे नेहमीच ऐकायला मिळते. मोर्चे, आंदोलने याचा उगम देखील बारामतीमधलाच म्हणावा लागेल. परंतु फक्त राजकीय दृष्ट्या नव्हे तर शैक्षणिक दृष्ट्या व शेती विषयक देखील किंवा कला क्षेत्रातील योगदान असेल बारामती नेहमी अव्वल राहिली आहे. पण या गोष्टी खूप कमी प्रकाश झोतात येतात. अनेक हिंदी,मराठी वेब सिरीयल, फिल्म चे बारामती मध्ये शूटिंग होत असतात. त्यामुळे बारामती मधील कलाकारांना वाव मिळत असतो.
कृषी क्षेत्रातील शिक्षण घेऊन एमबीए करून आपली कला जोपासत आज बारामतीचा वैभव झी मराठी वर जळकणार ही बारामती करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बारामती श्रीराम नगर येथील वैभव चव्हाण या तरुणाने एग्रीकल्चर चे शिक्षण घेतल्यानंतर एमबीए करून कला क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एकपात्री नाटक ने सुरुवात करून आज आज झी मराठी वरील प्राईम टाईम ची सिरीयल “मन झालं बाजींद” या सिरीयल मधील मुख्य कलाकारा पर्यंत वैभव पोहोचला आहे. झी मराठीवरील मन झालं बाजींद हि सिरीयल ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा टीजर आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य कलाकार म्हणून वैभव चव्हाण ची निवड झाली आहे. ही बारामतीकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज एक पात्री नाट्य, स्वराज्य जननी जिजामाता, मराठी बिग बजेट चित्रपट मध्ये काम करून आज वेगळ्याच “वैभवात” बारामती चं नाव मोठं करणाऱ्या वैभवला पुढील वाटचालीसाठी सर्व बारामतीकराकडून हार्दिक शुभेच्छा 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *