प्रतिनिधी : दिपक वाबळे – पंचायत समिती बारामती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बारामती प्रकल्प 1 व 2 यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम नवीन पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बारामती पंचायत समितीच्या सभापती सौ. निताताई फरांदे , प्रमुख पाहुणे उपसभापती श्री. रोहित कोकरे , गटविकास अधिकारी डाॅ.श्री.अनिल बागल, सहा. गटविकास अधिकारी मा. श्री. अभिमान माने, निताताई बारवकर , संजय भोसले, शारदाताई खराडे , लिलाबाई गावडे, भारत गावडे, प्रदीप धापटे, राहुल भापकर, मेनकाताई मगर , अबोलीताई भोसले, राहुल झारगड आदीं मान्यवर उपस्थित होते.

कारखेल ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी केंद्र भापकरवस्ती 2 चे अंगणवाडी सेविका सौ. दिपाली सुरेश भापकर यांनी सन 2021-22 अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केले बाबत त्यांना आदर्श सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

यावेळी त्यांनी मा.श्री.अभिमान माने बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका श्रीमती वृंदा बाप्ते यांचे सहकार्य मिळाले असे दिपाली भापकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *