प्रतिनिधी : दिपक वाबळे – बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील श्री. सिद्धेश्वर किसन गवळी यांची पुणे जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाली आहे.

आमदार श्री. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील जिरायत भागात काम करत असताना सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी झटणारा युवक म्हणून सिद्धेश्वर गवळी यांची ओळख आहे.

त्याच्या निवडीमुळे सुपे परगाण्यात काँग्रेस पक्षाच्या मोठी ताकत मिळेल अशी चर्चा सर्व स्थरातुन होत आहे. त्यांना निवडीनंतर सुपे परिसरातून अभिनंदनांचे फोन येत आहेत व योग्य व्यक्तीची निवड झाली असे मत उंडवडी सुपे येथील युवकांकडून व्यक्त होत आहे व खूप कौतुक होत आहे.

आगामी काळात काँग्रेस पक्षने सुपे परगाण्यातील चांगलं नेतृत्व पुढं केलं आहे. त्याचा फायदा काँग्रेसला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात व तरुणांनी व्यवसायाकडे वळावे व स्वतःचा व्यवसाय करावा असे त्याचे मत आहे. त्यांचा स्वतःचा सिद्धेश बिल्डर व होम डेकोरेशन व्यवसाय आहे.

सामाजिक न्याय व संघटन या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर त्याची काही दिवसांपूर्वीच निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *