भाग – १६ खानाखजाना या आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत कचोरी….
साहित्य- 250 ग्रा. मैदा, 2 ग्रा. मीठ, गा. सोडाबाइकार्बोनेट, 65 ग्रा. तेल, 80 ग्रा. पानी, 100 ग्रा. उडीद दाळ, 30 ग्रा. तूप, 20 ग्रा. अदरक, 6 ग्रा. हिरवी मिरची, । ग्रा. हिंग, । छोटा चमचा धने पावडर, 1½ चमचा जीरे पावडर, 1½ चमचा लाल मिरची, 14 चमचा सोफ पावडर, ½ छोटा चमचे साखर, मीठ चवीनुसार, 10 मिली लिंबाचा रस, 20 ग्रा. कोथंबीर, तळणासाठी तेल.
पद्धत- मैदा, मीठ आणि, सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, 65 ग्रा. ‘तेल टाकावे आणि चांगल्या तऱ्हेने मिळवावे पाणी (साधारण 80 मिली) घेउन नरम मळावे ओल्या कापडाने झाकून एका बाजुस ठेवावे. अदरक, हिरवी मिरची आणि कोथंबीर कापावी. उडदाच्या डाळीस एक तास भिजवावे. नंतर वाटावे. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, अदरक, हिंग आणि सर्व वाटलेले मसाले टाकावे. संपेपर्यंत शिजवावे, साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवरून काढुन घ्यावे कोथंबीर टाकावी आणि संपेपर्यंत शिजवावे. साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवरून काढुन घ्यावे कोथंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड होउ दयावे. मळलेल्या मैदयाचे 12 गोळे करावे. प्रत्येक गोळयास हातावर घेउन असे पसरावे कि ते मध्ये जाड व किनारीस पातळ असावे त्याच्या मध्ये तयार मिश्रण भरावे. किनारीस मोडुन गोल आकार देउन हलकेच दाबून चपटे करावे.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)