प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील सांगवी गावातील कु,आश्विनी शरद कदम या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवुन पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झालेली आहे.
कोल्हापूर येथे कृषी पदवी हे शिक्षण पूर्ण करून राज्य शासनाची कृषी सहायक या पदाची स्पर्धा परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिची निवड झाली होती. परंतु त्या पदावर समाधान न मानता तिने पुन्हा स्पर्धा परिक्षेचा सराव सुरू केला. २०१९ च्या परीक्षेमध्ये ग्राउंड मध्ये १०० पैकी १०० मार्क मिळविले, एकुण परीक्षेमध्ये २३५ मार्क तिने मिळवून राज्यात १२ वा नंबर मिळवून तिने यश प्राप्त केलेले आहे, सामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलीने मिळवलेले असामान्य यश आपल्या गावसाठी एक दिशादर्शक व अभिमानास्पद आहे, नव्या पिढीने या यशस्वी व कर्तुत्वान मुलीचा आदर्श घेऊन विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत सांगवी गावच्या ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले व सर्व ग्रामस्थांनी अश्विनी कदम चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.