प्रतिनिधी – मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२ रोजी विद्या प्रतिष्ठान संचालित वसुंधरा वाहिनी हिरकणी सॅनिटरी नॅपकीन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गजानन भिवराव देशपांडे विद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘उज्वल भविष्यासाठी महिला सबलीकरण’ कार्यक्रमांना सुरुवात केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात MES हायस्कूलच्या मुख्यध्यापक उमेद सय्यद सरांनी विद्यार्थीनीना मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत नेहमीच सुरक्षित वातावरण देत असल्याने पालक आश्वस्त असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात निर्भया पथकाच्या महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी मुलींना छेडछाडीच्या प्रसंगाला निर्भयपणे कसे सामोरे जावे याविषयी मुलींशी संवाद साधून माहिती दिली.

आयुर्वेदाचार्य डॉ. भक्ती महाजन यांनी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी त्यांच्याशी हसतखेळत संवादातून मार्गदर्शन करत विद्यार्थीनीशी संवाद साधला.

हिरकणी सॅनिटरी नॅपकीन हा गृहउद्योग सहाय्यक ठरत असून श्री व सौ रेश्मा अक्षय साबळे यांनी या कार्यक्रमामध्ये ७०० विद्यार्थीनीना हिरकणी सॅनिटरी नॅपकीन गिफ्ट दिले.

कार्यक्रमाला MES हायस्कूलचे उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे हे उपस्थित होते

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या.

विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ आशा मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सुत्रसंचलन मंगल हेगडे यांनी केले अपर्णा शिंदे यांनी आभार मानले

विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक प्रभुणे, संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, डॉ. आर. एम. शहा, श्री. मंदार सिकची सर्व विश्वस्त मंडळ, तसेच व्ही.आय.आय.टी.चे डायरेक्टर डॉ. आनंद देशमुख, यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निवेदक स्नेहल कदम व ऋतुजा आगम तसेच तंत्र सहाय्य सचिन केसकर, चेतन धुमाळ यांनी सहयोग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *