प्रतिनिधी – दि. ८ मार्च २०२२ रोजी विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सचिव अ‍ॅड. निलिमाताई गुजर, विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य. धनंजय देशपांडे, प्रा.राजश्री पाटील, जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. सुमन देवरुमठ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड. निलिमाताई गुजर यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्व पटवून देताना, पुरुषानी स्त्रियांचा सन्मान करणे आज काळाची गरज आहे, कारण स्त्रिया आज चांगले कुटुंब देखील चालवतात. महिलांनी आज चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घातली आहे, त्यांनी चाकाचा व शेतीचा शोध लावला, हळूहळू कुटुंब व्यवस्था निर्माण केली व पुरुषासोबत त्याच क्षमतेने, जबाबदारीने काम करू लागल्या आहेत. महिलांना जेव्हा समान संधी मिळते तेव्हा समाज चांगला तयार होतो. या वर्षी ज्या महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात, विज्ञानात, पर्यावरणात चांगले कार्य केले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यानी आरोग्याकडे लक्ष्य दिले पाहिजे, व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास वाढवला पाहिजे, जीवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना केला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही खास महिला असतेयाविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य धनंजय देशपांडे व प्राचार्यां डॉ. सुमन देवरुमठ यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलाविषयी आपले मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी कु. देवश्री वायाळ व विकिराज घाडगे यांनी महिलाबद्दल आपले विचार मांडले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण व स्त्रीपुरुष समानता याविषयी मन हेलाऊन टाकणारी लघुनाटिका सादर केली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वादविवाद, पोस्टर सादरीकरण, रांगोळी व मेहंदी अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता व त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमप्रमुख पाहुणे अ‍ॅड. निलिमाताई गुजर यांच्या हस्ते घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी वालेकर यांनी केले व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत शेरखाने यांनी मानले.
तसेच हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस यशस्वी होण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर श्री. गजानन मोरे, शैक्षणिक प्रभारी प्रा. शैलजा हरगुडे, प्लेसमेंट ऑफिसर सायली बडेकर, अनुजा गांगुरडे, सीमा पाटील, डॉ बिपिन पाटील आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *