प्रतिनिधी – सहेली उद्योजिका ग्रुपच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 मार्च व 9 मार्च रोजी आयोजित शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये बारामती व परिसरातील अनेक महिलांनी सहभाग घेतल्यामुळे या फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन बारामती नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे यांनी केले असून यावेळी सौ सुहासिनी सातव, वनिता ताई बनकर, मिनाक्षी ताई तावरे, आरतीताई शेंडगे, भाग्यश्री ताई धायगुडे, अभिनेत्री अनु गोडसे, अभिनेत्री संदेशा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे मॅडम उपस्थित होत्या. जायंट्स क्लब गार्डन, सिटी इन हॉटेल शेजारी भिगवन रोड एमआयडीसी येथे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध वस्तू, कपडे,खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू महिलांनी घरगुती बनवलेले पदार्थ /वस्तू यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मत रोहिणी आटोळे खरसे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *