भाग – १४ खानाखजाना या आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत शाही मटर पनीर …..
साहित्य – 2:50 ग्रा. वाटयाण्याचे कुटलेले दाणे, 10 ग्रा. पनीर, ( ½ इंचाच्या चौकोर आकारात कापावे) 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे, 5 लसणाच्या पाकळया, आणि इंच कांद्याची पेस्ट, 2 मोठे चमचे मलई, 1 मोठा चमचा रिफाइन्ड तेल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ.
पद्धत – कढईत तेल गरम करून त्यात किसलेला कांदा व लसणाची पेस्ट टाकावी. कांदा गुलाबी होई पर्यंत भाजावा. नंतर त्यात मलई आणि कापलेले टोमॅटो टाकावेव भाजावे आणि मीठ, तिखट, हळद आणि गरम मसाला टाकावा. यानंतर दळलेले वाटाणे टाकुन भाजावे. नंतर त्यात जायफळ आणि 2 छोटया विलायची वाटुन टाकाव्या. आता यात • पनीरचे तुकडे टाकुन 2 मिनीट भाजावे तसेच एका वाटीत पाणी टाकावे. उकळी आल्यानंतर त्यास 5 मिनीट कमी उष्णतेवर शिजु द्यावे. शाही मटर पनीर तयार आहे. तयार भाजीवर कापलेली कोथंबीर आणि तिखट टाकुन गरमा गरम पराठ्यांबरोबर वाढावी.