विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

प्रतिनिधी- भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचे औचित्य साधून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची ७५ वर्षातील वाटचाल आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर या संकल्पनेवर विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ राजेश शर्मा व प्राध्यापक नीलिमा पेंढारकर मॅडम यांच्या हस्ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते डॉ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. 

प्राध्यापक नीलिमा पेंढारकर यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन  यावर माहिती सांगून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व आणि आपले विधार्थी वैज्ञानिकदृष्ट्या कसे प्रगत होतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीसाठी त्याचा शेतकर्‍यांना फायदा झाला पाहिजे. तसेच माननीय पंतप्रधानांच्या “मेक इन इंडिया” या संकल्पनेच्या आधारे “मेक इन स्वराज” ही संकल्पना पुढे आली पाहिजे. डॉ राजेश शर्मा सरांनी जनुकीय सुधारित पिकं म्हणजे नक्की काय? पिकांची लागवड करण्यामागचा दृष्टीकोण, जनुकीय सुधारित पिकांमध्ये मका, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, बटाटा, आणि भात या महत्त्वाच्या पिकांचा समावेश आहे या बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच वादविवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील चार टीमनी सहभाग नोंदविला. त्यापैकि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. 
दिनांक. २ मार्च रोजी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर या संकल्पनेवर पोस्टर सादरीकरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये एकोणीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ तुषार बोरसे सर व डॉ कल्पना चंद्रमोरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ तुषार बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टरचे विशेष कौतुक केले, पोस्टर सादरीकरण करताना त्याचा  हेतू स्पष्ट आणि लक्ष्यवेधी असायला हवा व त्याचा परिणाम पोस्टर परीक्षनार्थ्य्या मधून दिसला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.  पोस्टर सादरीकरणात प्रथम क्रमांक कविता पालेकर, दूसरा क्रमांक  बद्रीनाथ बतुले व वेदान्त निबाळकर, तिसरा क्रमांक वैष्णवी शेळके व राधिका परदेशी तसेच उत्तेर्जनार्थ बक्षीश धृवेश चौहान यास मिळाले.

दिनांक 3 ते ४ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांच्या प्रयत्नातून  नांदी फाउंडेशन - महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्यातर्फे  महाविद्यालयात दोन दिवसाची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यासाठी हर्षिता तिवारी व मुक्ताजी कांबळे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी  नांदी फाउंडेशन आणि महिंद्रा प्राईड क्लासरूम शेतकर्‍यांची शेती सुलभ होण्यासाठी कशा पद्धतिने कार्य करत आहे व हरित क्रांती व सेंद्रिय द्रव खत कशा पद्धतिने बनवले जाते याची प्रात्यशिके करून दाखविली. 

दिनांक ५ मार्च रोजी कृषि उत्क्रांती या विषयावर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी लघूनाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी वालेकर हिने केले व आभार प्राध्यापक प्रांजली बदाने हिने मानले.

विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ सुमन देवरुमठ यांनी राष्ट्रीय विज्ञान सप्ताहच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच यापुढे विद्यार्थी आणि शिक्षकांचे संशोधनकार्य चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले. तसेच हा विज्ञान सप्ताह यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातिल  शैक्षणिक प्रभारी प्राध्यापक शैलजा हरगुडे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत शेरखाने, प्लेसमेंट ऑफिसर सायली बडेकर, अनुजा गांगुरडे, सीमा पाटील, डॉ बिपिन पाटील, जिज्ञासा ओक आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *