बारामती दि.4: आज काल डॉक्टरी पेशा हा मोठा व्यवसाय झाला आहे.आपल्या डॉक्टरी पेशाचा वापर करून वारेमाप फी आकारून बक्कळ पैसे कामविणाऱ्या डॉक्टरांची आपल्याकडे काही कमी नाही.पण आजच्या या व्यवसायिक जगात सुद्धा पैशाचा मोह न बाळगता प्रामाणिकपणे आणि माणुसकीच्या भावनेतून रुग्णसेवा करणारे,रुग्णसेवेचा आपला घेतलेला वसा जपणारे डॉक्टर सुद्धा आहेत.आणि याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे बारामतीतील शिवनंदन हॉस्पिटलचे ‘डॉ.गणेश बोके’
या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि.१ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास एक व्यक्ती शिवनंदन हॉस्पिटल समोर असलेल्या एका झाडावरती काम करत असताना.अचानक झाडाची फांदी जवळ असलेल्या एका विद्युत तारेला चिकटल्यामुळे त्या झाडावरती काम करत असणाऱ्या व्यक्तीला विजेचा झटका बसला आणि तो व्यक्ती खाली गटारीच्या नाल्या मध्ये पडला.घडलेला सर्व प्रकार शिवनंदन हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्ड ने पाहीला असता तो त्या ठिकाणी मदतीसाठी धावून गेला.बघता बघता त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली.मात्र कोणीही त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे धाडस झाले नाही.घडलेला हा प्रकार डॉ.बोके यांच्या कानावर पडताच ते ओ.पी.डी सोडून थेट घटनासथळी गेले अन क्षणाचा हि विलंब न लावता जोखीम पत्करून अन कोणतीही औपचारिकता न करता आपल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्या व्यक्तीला त्या नाल्यातून बाहेर काढून थेट आपल्या हॉस्पिटल मध्ये दाखल करत त्याच्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर लावून उपचार सुरु केले.

काही वेळानंतर त्या रुग्णाची माहिती घेता.त्याला कोणीच जवळचे नातेवाईक नसून तो बेवारस असल्याचे लक्षात आले.परंतु तरी देखील डॉक्टरांनी उपचारात कोणतीही कमतरता न करता.डॉ.बोके यांनी त्या बेवारस व्यक्तीवर अगदी तत्परतेने यशस्वी उपचार करून मरणाच्या दारात असलेल्या रुग्णाला जीवदान दिले.आणि सामाजिक कार्यकर्ते शुभम अहिवळे यांच्याशी संपर्क करून त्या रुग्णाचा माणुसकीच्या नात्याने सांभाळ करणाऱ्या आमराईतील सकट कुटुंबीयांकडे त्याला सुपूर्त केले.त्यामुळे आजच्या या काळात पैशाला महत्व न देता,सेवाभावीपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ.गणेश बोके यांच्यातील माणुसकीचे अनोखे दर्शन झाले.
दरम्यान,डॉ.गणेश बोके यांच्यासह त्यांच्या हॉस्पिटल मधील डॉ.गणेश आंबोळे,डॉ.शशिकांत मोरे,डॉ.कमलाकर धाईंजे,डॉ.तेजस्विनी म्हस्के,डॉ.अतुल जाडकर,हृदयरोग तज्ञ डॉ.केतन आंबर्डेकर,अमृता नरुटे,वर्षा आवळे,ऋतुजा गुणवरे,शितल राऊत,शेपा बिस्वास,गणेश मासाळ,विकास लव्हाळे,साईनाथ कदम,विशाल वाघेला,गायकवाड मामा,सागर बनकर,अर्चना देवरे,खामगळ यांच्यासोबतच शिवनंदन मेडिकलचे निलेश जगताप आणि क्ष-किरण विभागाचे काशीद आणि शुभम यांनी देखील विशेष सहकार्य करून त्या रुग्णाचे प्राण वाचविण्यास खूप मोठी मदत केली. डॉ.गणेश बोके आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम!

लेखन – शुभम अहिवळे, पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *