भाग – १२ आजच्या खानाखजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत बिर्याणी ची रेसिपी…
साहित्य – 3 कप तांदुळ, 3. कप उकळलेल्या भाज्या, 5 कांदा, 1 कप घट्ट दही, 3 चमचे केशर, 2 चमचे दूध, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 6 टेबलस्पून तूप, तळन्यासाठी तूप.
वाटण्याचा मसाला – 2 मोठे कांदे, 6 पाकळी लसूण, 2 चमचे खसखस, 2 चमचे शोप, 1 इंच अदरक, 4 लाल मिरच्या, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लवंग, दालचिनी, 5 मिरे, 2 टेबल स्पून किसेलेले नारळ, 1½ चमचे जीरे, 3 चमचे धणे..
पद्धत – तांदूळ मोकळे होईपर्यंत शिजवावे तांदुळात आणि भाजीत मीठ टाकावे. एका कढईत कांदा लाल होईपर्यंत तळावा. कांदा काढुन 2 चमचे नारळाचे दुध टाकावे आणि केसर टाकुन केसर मिसळेपर्यंत चाळावे. यात भात मिळवून घ्यावा. एका वेगळ्या भांडयात 2 चमचे तूप गरम करून वाटलेला मसाला 3-4 मिनीट भाजावा. थंड करून मीठ, दही व साखर टाकावी. एका वेगळ्या भांडयात 4 चमचे तूप टाकावे. तसेच थोडासा कांदा टाकावा. आता तांदुळ टाकावे. तसेच तांदुळावर थोडासा कांदा व वाटलेला मसाला टाकावा. त्यावर भाज्या पसरून घ्यावा. उरलेला भात व कांदा टाकावा. वरून झाकुन द्यावे 400 फॅरनहाइट वर 25 मिनीट शिजवावे वाढण्या अगोदर एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे टाकावे. गरम गरम वाढावे.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)