भाग -11 खाना खजाना या सदरामद्ये आज पाहणार आहोत काजुकरी ची रेसीपी
साहित्य- 50 ग्राम खरबूज व कलींगड बी, 100 ग्रा. खसखस, 60 ग्रा. खोबरे, 500 ग्रा. कांदा, ½ किलो टोमॅटो, 50 ग्रा. काजू, 50 ग्राम चारोळी, 100 ग्रा. मावा.
पद्धत खसखस, खरबुजे, कलींगड बी, खोबरे, काजू, चारोळी वाटून घ्यावे. (काजू 25 ग्राम वाटावी) टोमँटोचे सूप बनवाचे. तसेच कांदा तळुन वाटावा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाकावे तसेच अद्रक टाकून भाजावे मग हळद, मिरची आणि वाटलेले काजू टाकावे 2 • मिनिटानंतर कांदा व टोमॅटोचा मसाला टाकावा. 100ग्रा. मावा टाकावा. 2 चमचे गरम मसाला टाकून थोडेसे पाणी टाकावे. चवीनुसार मीठ टाकून काजू आणि कोथिंबीर ने सजवावे.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)