बारामतीत ‘महाराष्ट्र स्ट्रीट डान्स चॅम्पियनशिप’ स्पर्धा उत्साहात संपन्न

बारामती दि.१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीएमटी डान्स ग्रुप ने आयोजित केलेली महाराष्ट्र स्ट्रीट डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा बारामती येथील जयश्री गार्डन येथे असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धे मध्ये महाराष्ट्रासह महाराष्ट्रा बाहेरील स्पर्धकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे हिपपॉप डान्स विश्वात प्रसिद्ध असलेले इंडियाज गॉट टॅलेंट चे विजेते आणि ब्रॉंज मेंडेलिस्ट प्रशांत शिंदे हे स्पर्धेला प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहिले होते.या स्पर्धे मध्ये आपली कला सादर करत असताना अनेकांनी प्रेक्षकांची मने जिंकून एकास एक असे सादरीकरण केले.त्यामुळे बारामतीकरांना देखील अशी एक वेगळ. दिमाखदार डान्स स्पर्धा अनुभवयास मिळाली.सदर स्पर्धे मध्ये इंडियन मारवेल मुंबई यांनी प्रथम क्रमांक तर अँडी डान्स ग्रुप गुजरात आणि ॲली एंजल डान्स ग्रुप मुंबई ने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला.दरम्यान,महाराष्ट्र स्ट्रीट डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा हि पहिल्यांदाच महाराष्ट्रा मध्ये विशेषतः बारामती मध्ये संपन्न होत असून या स्पर्धेच्या माध्यमातून तळागळातील कलाकारांना एक चांगला आणि मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीएमटी डान्स ग्रुपचे प्रशिक्षक आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुमित मोहिते,गणेश साबळे,नासिर अन्सारी,शिवाजी चव्हाण,मयूर रसाळ,अरविंद शेलार,विकास पवार,राज टेकवडे,तथागत कांबळे,रोहित वाघमोडेयांनी परिश्रम घेतले तर स्पर्धेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध समालोचक ज्ञानेश्वर(मामा)जगताप यांनी पार पाडली.
दरम्यान या स्पर्धेला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह दुर्योधन भापकर,राहुल भापकर,आरती शेंडगे गव्हाळे,शंकर गव्हाळे,शुभम अहिवळे,संतोष सातव,राकेश वाल्मिकी,आकाश पोळके,पिंटूभाऊ गायकवाड,सनिश माळवे,राम बंडगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *