भाग-10 खाना खजाना या सदरा मध्ये आज आपण पाहणार आहोत पालक पनीर ची रेसिपी
साहित्य- पालक, 200 ग्राम पनीर, एक मोठे टोमॅटो, एक कांदा, 4 पाकळी लसुण, एक तुकडा अद्रक, 500 ग्रा. दही, बे सन, मीठ, मिरची, तूप अंदाजे..
पद्धत- बेसन भाजून वेगळे ठेवणे, पालक धुवून कापावे, कांदा, लसूण व अद्रक वाटून घेणे, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, पनीर चे छोटे तुकडे कापून तळावे. कुकरमध्ये मीठ व पाणी टाकून पालक उकळावे. उकळलेला पालक पाणी गाळून अलग करणे. तसेच पालक वाटून घ्यावे. आता भांड्यात तूप गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत भाजणे. नंतर त्यात अद्रक लसुण, टोमॅटो, लाल मिरची टाकून भाजावे. आता यात बेसन व दही मिसळावे. आता वाटलेला पालक व तळलेले पनीर टाकुन हलवावे. तसेच पालकाचे काढलेले पाणी टाकावे. 5 मिनीटानंतर उतरून घ्यावे. तसेच कोथंबीर व पनीर याने सजवावे.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर.
(महिला प्रतिनिधी)