प्रतिनिधी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने बारामती तालुक्यात सात जिल्हापरिषद गट अस्तित्वात आले आहेत, त्यामध्ये निरावागज- डोरलेवाडी गटामध्ये निरावागज, खांडज, मेखळी, डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, ढेकळवाडी या गावांचा समावेश आहे. या गटामध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मतदार संघामध्ये अनेकांनी संपर्क वाढवला आहे, त्यामधे निरावागज गाव चे भाजपच्या प्रदेश पातळीवर काम पाहणारे युवानेते अभिजीत देवकाते यांनी या गटा मध्ये मोठा जनसंपर्क वाढवला आहे लग्नसमारंभ तसेच युवकांचे वाढदिवस, तसेच अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडविणे, या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवला आहे, युवकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा आणि मदत करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे, व तरुणांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे, २०१४ सालापासून त्यांचे काम सुरू आहे त्यामुळे या गटा मध्ये सत्ताधारी पक्षाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे.