प्रतिनिधी – भिगवण आणि परिसरातील घडलेल्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान मा. मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये भिगवण पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहा पोलीस निरीक्षक, रूपेश कदम पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार नाना वीर, सचिन पवार, महेश उगले, गणेश पालसांडे , अंकुश माने यांचा सन्मान करण्यात आला. भिगवण परीसरामधील गंभीर गुन्हे , घरफोड्या, चो-या यासारखे गुन्हे उघडकीस आणुन केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.