प्रतिनिधी – कविवर्य कुसुमाग्रज यांच्याजयंती निमित्त मराठी भाषा दिन आज सकाळी बारामती बस स्थानक येथे साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता महाडिक व संजय भिसे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सचिन गुप्ता, आगार व्यवस्थापक श्री अमोल गोंजारी, वाहतूक अधीक्षक अर्पना पवार, सहा पोलीस उपनिरीक्षक श्री चांदगुडे आणि S. T. कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनि अभिवादन केले. मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या व अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, असे मत गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.