भाग -९ आजच्या खाना खजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत बटाट्याचे रायते ..
साहित्य – 1 मोठा उकडलेला बटाटा, 2 कप ताजे दही, 1 बारीक कापलेला कांदा, 1½ चमचे मीठ, ½ चमचे वाटलेली धणे, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 जुडी कोथंबीर कापलेली, ½ चमचे जीरे भाजुन वाटलेले.
पद्धत – उकडलेला बटाटा सोलून बारीक कापावा, दहयात मीठ, धन्याची पावडर व जीरे टाकुन चांगल्या तऱ्हेने फेटावे, बटाटे व कांदा टाकुन मिळवावें, हिरवी मिरची व धणे वरून बुरकावे व जेवणाच्या टेबलावर सजवावे हे रायते विशेषतः पराठयांबरोबर स्वादिष्ट लागते.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)