दही वडा

भाग -८ आजच्या खानाखजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत “दही वडा” कसा बनवायचा याची रेसिपी .

साहित्य वडयासाठी- 200 ग्रा. 1 कप धुतलेली उडीद दाळ, 3 कप पाणी छोटा चमचा जीरे, 5 ग्रा. कापलेले अदरक एक छोटा चमचा 1 मीठ, 250 ग्रा. तेल.

साहित्य (दही मिश्रणासाठी) 400 ग्रा. दही, 1 छोटा चमचा साखर, 3/4 छोटा चमचे जीरे भाजलेले आणि बारीक केलेले, ½ छोटा चमचे काळे मीठ, 2 ग्रा. सफेद काळी मिर्च पावडर.

सजविण्यासाठी 5 ग्रा. अदरक, 5 ग्रा. हिरवी मिरची, 5 ग्रा. कोथंबीर, कापलेली, एक चुटकी लाल मिर्च पावडर, 1 चुटकी भाजून कुटलेले जीरे, 4 काडी पुदीना पाने, 40 ग्रा. चिंचेची चटनी.

पद्धत – धुतलेल्या उडदाच्या डाळीस स्वच्छ करून 2 तास पाण्यात भिजवावी व काढुन वाटावी. आवश्यकता असेल तर थोडे पाणी टाकावे. एका वाटीत ठेउन मीठ, जीरे, अदरक, हिरवी मिरची टाकुन चांगल्या तऱ्हेने मिळवावे, एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे कढईत तेल गरम करावे. थोडे थोडे करून गोळे ओल्या हाताने टाकावे लालसर भुरे होईपर्यंत शिजवावे (तळण्याअगोदर गोळयाच्या मध्ये अंगठयाने दाबून छिद्रा सारखे बनवावे) व काढुन द्यावे तयार वडयांना पाण्यात नरम होई पर्यंत भिजवावे फेटलेल्या दहयात साखर, मीठ, जीरे पावडर काळे मीठ आणि सफेद काळी मिरी टाकावी व चांगल्या तऱ्हेने मिळवावे. वडयांना पाण्यातुन काढुन हळुच नितरून अतिरिक्त पाणी काढुन दहयात मिळवावे. 10-15 मिनीट एका बाजुस ठेवावे. थंड करून अद्रक , हिरवी मिरची, कोथंबिर , लाल मिरची पावडर , जिरा पावडर, पुदिना पाने आणि चिंचेची चटणी सजवून वाढावे.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *