बारामती: बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी रोहिणी आटोळे-खरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र महिला अध्यक्षा वनिता बनकर व धनवान वदक आणि युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी व युवती काँग्रेस च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविणे व महिला, युवती यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर रोहिणी आटोळे खरसे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *