साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार प्रथम वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..

                                    वालचंदनगर विशेष प्रतिनिधी- वालचंदनगर येथे दिनांक 19 /2 /2022 रोजी साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार या वृत्तपत्राचा प्रथम वर्धापनदिन व विशेषांक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीरयोद्धामाता सावित्रीमाई उबाळे, शहीद पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांच्या प्रतिमेचे पुजन धूप व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  याप्रसंगी साप्ताहिक रयतेचा भिमप्रहार चे मालक प्रकाशक व मुख्य संपादक भीमसेन सर्जेराव उबाळे सर यांनी आपले मनोगत व साप्ताहिकाचे उद्दिष्ट व धोरण आपल्या प्रस्ताविकमध्ये सविस्तर मांडले, यानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा श्री भगवानराव वैराट साहेब संस्थापक अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती मध्ये विरसिंहभैया रणसिंग तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या सर्व सर्व उपस्थित विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे व पत्रकारांचे तसेच मंत्री महोदयांच्या सर्व स्वीय सहाय्यक यांचे तसेच परिसरातील विविध आशा वर्कर तसेच इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना प्रतियोद्धा या विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत, वीरसिंह रणसिंग, बारामती संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश नालंदे, इंदापूर तालुका अंगणवाडी सेविका अध्यक्ष सौ पुनम निंबाळकर, सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.मा. नामदेवराव भोसले यांनी आपली सामाजिक व्यथा मांडत साप्ताहिक  रयतेचा भीमप्रहार आपल्या अंकामध्ये वाट मोकळी करून देतात या भावना व्यक्त केल्या आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले वैराट साहेबांनी पत्रकारितेचे पूर्वीचे व आजचे सविस्तर विश्लेषण आपले मनोगत मांडले तसेच शिवजयंती ही वैचारिक पातळीवर साजरी झाली पाहिजे ती आज खऱ्या अर्थाने साप्ताहिक रयतेचा भिम प्रहार च्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून वैचारिक पातळीवर साजरी होत आहे त्यानंतर राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी त्यांचे मनोगता मध्ये म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने उबाळे कुटुंबियांचा स्वाभिमानाचा व सामाजिक कार्याचा आदर्श घ्यावा तसेच पत्रकार संपादक भीमसेन उबाळे सर हे आपल्या साप्ताहिक रयतेचा भिमप्रहार माध्यमातून समाजाच्या व्यथा तसेच काय चूक काय बरोबर हे आपल्या लेखणीतून सडेतोडपणे सातत्याने मांडत असतात तसेच समाजाला एक नवीन दिशा देण्याचे तळमळीने प्रयत्न करीत असतात असे मत विचार मंचावरून नामदार दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केले.          

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,भीमशक्तीचे अध्यक्ष युवराजमामा पोळ, रा.युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, पुणे नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ, सुरज वनसाळे, डॉ राजेश कांबळे, डॉ हेगडकर, प्रा.अरून कांबळे, प्रा.हनुमंत कुंभार, प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर तसेच उधोजक कासम भाई कुरेशी, त्याचबरोबर पत्रकार संतोष जाधव, तानाजी पाथरकर, योगेश नालंदे, स्वप्नील कांबळे, नानासाहेब साळवे, मन्सूर शेख, गौरव अहिवळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमसेन उबाळे सर यांनी केले. सूत्रसंचालन निलेश धापटे व पत्रकार तानाजी पाथरकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार एम व्ही पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपादक भीमसेन उबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पवार सर, काजल भोसले मॅडम, हर्षवर्धन उबाळे, विश्वराज उबाळे, अभिराज उबाळे, तसेच सर्व ठिकाणच्या तालुका व गाव प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *