बारामती लाईव्ह ने साजरा केला वैचारिक शिवजयंतीचा सोहळा..

बारामती -: बारामतीकरांसाठी वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचा एक प्रयत्न बारामती लाईव्ह च्या वतीने करण्यात आला आहे. या प्रासंगी बारामती लाईव्ह चैनलच्या वतीने एक नवा संदेश लोकांच्या समोर मांडण्यात आला आहे. बारामती लाईव चैनलने श्री छत्रपती शाहू हाईस्कूल मध्ये ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक येणार्‍या युवा पिढीला देऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर आपले जीवन कसे जगावे हे ध्येय आज बारामती लाईव चैनलने जगासमोर ठेवून वैचारिक शिव जयंती साजरी करण्याची सुरवात केली.
या वैचारिक शिवजयंती मध्ये सुनील महाडिक ( पोलिस निरीक्षक बारामती शहर), मा. दादाराजे महाले सपकाळ ( जिवाजी महाले यांचे 11 वे थेट वंशज), मा. रोहित नलावडे ( संभाजी रक्षक मालिकेचे सल्लागार यांचे चिरंजीव), मा. देवीदास वायदंडे ( CNET सदस्य पुणे विद्यापीठ), ॲड अमोल सोनवणे ( विशेष सरकारी वकील ), ॲड बापूसाहेब शीलवंत ( कायदेशीर सल्लागार), मा. श्री.दादा जाधव, श्री.विनोद जगताप ( संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव), श्री.टी.व्ही मोरे ( आरोग्य अधिकारी ) मा. श्री.लक्ष्मन बगाडे ( आरोग्य अधिकारी), मा.कृष्णा जेवादे( आरोग्य मित्र), मा.प्रदीप ढुके ( सामाजिक कार्यकर्ते ), विशाल धेंडे ( सामाजिक कार्यकर्ते, बी .एन . पवार ( प्राचार्य छत्रपती शाहू हाईस्कूल), बारामती मधील सर्व पत्रकार बांधव, तसेच अमित बगाडे ( मुख्य संपादक बारामती लाईव्ह ) व सर्व बारामती लाईव्ह टीम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनकुमार पतकी यांनी केले व सर्व मान्यवरांचे आभार बारामती लाईव्ह चे कार्यकारी संपादक मधुकर बनसोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *