प्रतिनिधी – तांदूळवाडी परिसरात ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे, डोक्यात भगवे फेटे आणि जय भवानी, जय शिवाजी अशा कणखर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तांदुळवाडी परिसरातील नगरसेवक समीर चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते यांच्या तर्फे उभारण्यात आलेली महाराजांची मूर्ती लक्षवेधी ठरली . माजी नगराध्यक्ष पोर्णिमाताई तावरे व बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी याठिकाणी पूजन करून महाराजांना वंदन केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले कि, लोकांना येणाऱ्या अडीअडचणी दूर कशा केल्या जातील. विकासाची कामे अशाप्रकारे सुरूच राहतील. समीर चव्हाण नगरसेवक हे कशाप्रकारे तांदुळवाडीच्या विकासासाठी सतत झटत असतात. या सर्व गोष्टींची माहिती आपल्या वक्तव्यामध्ये व्यक्त केली.
तांदुळवाडी प्रभाग १ मधील कार्यक्रमाला पोर्णिमा तावरे, सचिन सातव, मुख्याधिकारी रोकडे, दादा तावरे , समस्त पदाधिकारी व गावकरी मोठ्या प्रमाणावर उत्साहात उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मोठा दिलासा देत. नवी नियमावली जारी केली होती. त्यामुळे शिवजयंती धूमधडाक्यात पार पाडण्यात आली.