माळेगाव – (प्रतिनिधी, गणेश तावरे ) १९ फेब्रुवारी महाशिवजन्मोत्सव सर्व बहुजन महापुरुषांची एकत्रित महाशिवजयंती जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या शिवजयंतीमध्ये मुले व मुली यांनी बहुजन महापुरुषांच्या वेशभूषा करून प्रभातफेरी काढून आगळा वेगळा संदेश देण्यात आला. स्वागत व सूत्रसंचालन टिचर ज्योती जगदाळे यांनी केले व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी केले. यावेळी मुले व मुली यांनी बहुजन महापुरुषांचे विचार सादर केले. स्कूलच्या प्रिसिंपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांनी विध्यार्थ्यांचे शिवअभिनंदन केले. स्कूलचे पालक योगेश भगतसिंह जगताप यांनी मुले व मुली यांचे सर्व फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच जहागिरदारवस्ती वरील स्कूलचे पालक आकाश चिकणे यांनी घोडा उपलब्ध करून शिवजयंतीमध्ये मुलांमध्ये उत्साह द्विगुणित केला, सर्व पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. स्कूलच्या प्रिसिंपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *