वसुंधरा वाहिनी राज्यात प्रथम क्रमांकावर

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी ने महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओं मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशन यांच्या वतीने महाराष्ट्रातील कम्युनिटी रेडिओ साठी कार्यक्रमांची स्पर्धा घेण्यात आली.

रेडीओद्वारे कोविड जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरु करून कोविड उपचार, आहार, कोविड काळातील समस्या आणि उपाय, महिला, युवक, गरोदर माता, बालके यांच्या आरोग्यासाठी ‘आमची उर्मिला’ या जनजागृतीपर कार्यक्रमांची मालिका वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओंच्या कार्यक्रमांच परीक्षण करून ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख मा. राजेश्वरी चंद्रासेकर यांनी विजेत्या कम्युनिटी रेडीओंची नावे जाहीर केली. या कार्यक्र्मासाठी सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक मा. निशीत कुमार, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या बाल संरक्षण विशेषज्ञा मा. अल्पा वोरा, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वर्तवणूक बदल विशेषज्ञा मा. सोनाली मुखर्जी, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या वकिली आणि भागीदारी संप्रेषण विशेषज्ञ मा. स्वाती महोपात्रा, युनिसेफ़ महाराष्ट्राच्या सल्लागार मा. सरिता संकरण, एस बी सी 3 कार्यक्रम प्रमुख पूजा यादव आणि महराष्ट्रातील सर्व कम्युनिटी रेडिओचे संचालक हे या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित होते.

कोरोना सारख्या संकटाना तोंड देण्यासाठी शासन आणि जनसामान्यांना जोडणारा पूल म्हणून काम करत असल्याने वसुंधरा वाहिनीला हे यश मिळवता आल्याचे मत विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केले.

विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक प्रभुणे, संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, विश्वस्त किरण दादा गुजर, आर.एम. शहा, मंदार सिकची, तसेच व्ही.आय.आय.टी.चे संचालक डॉ. आनंद देशमुख, ऑफिस सुप्रिटेंडंट संजय जगताप यांनी प्रोत्साहन दिले.

युनिसेफच्या माध्यमातून कम्युनिटी सोबत काम करताना खऱ्या अर्थान कम्युनिटी रेडिओचा उद्देश साध्य होत असल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ. आशा मोरे यांनी सांगितले.

आर.जे. स्नेहल कदम, आणि ऋतुजा आगम, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये सायली कासार, अक्षय कांबळे, अवंतिका वाबळे यांनी सहभाग घेतला. लेखन रवींद्र गडकर, माधवी गोडबोले, यांनी केले. संदीप दानवले, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *