भाग – २ घरचा वैद्य आजीबाईचा बटवा या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत डोळ्याखाली असणारी काळे घेरे, त्यांचे वाढत असलेले प्रमाण व त्यावरती उपाय
१) पोट खराब असणे, संतुलित भोजन घेणे, मानसिक ताण, लिव्हर खराब असणे इत्यादी कारणांमुळे डोळ्याखाली काळे घेरे पडतात ही करणे दूर केल्याने हळू हळू हे काळेपणा कमी होत जातो .
२) दररोज दुधाची साय काळया घेऱ्यांवर नियमितपणे लावावे . कच्चा बटाटा मधोमध कापून डोळ्यांवर ठेवून लेटावे अर्ध्यातासानंतर पाण्याने धुवून घ्यावे.
३) काकडीच्या फोडी या घेऱ्यांवर घासल्याने काळेपणा दूर होतो. गाजराच्या मौसमात गाजर खिसून घेऱ्यांवर लावावे १५ – २० दिवस हा उपाय करावा.