प्रतिनिधी – क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांची बारामती येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. देशात क्रांतिकारी वादळ सुरू करून लहुजी साळवे यांनी तरुणाच्या मनात स्वातंत्र्याचे बीज रोवले आपल्या तालमीत अनेक क्रांतिकारक तयार केले. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले अशा लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती समाजकल्याण सदस्य साधू बल्लाळ, जिल्हा मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे, उपाध्यक्ष दिलीपराव सोनवणे, ज्येष्ठ नेते टी.व्ही.मोरे, घेरे सर व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणामध्ये साधू बल्लाळ म्हणाले की आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांनी चळवळीला ताकद देण्याचे काम केले. आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे म्हणाले की जगेल तर देशासाठी आणि मी मरेल तर देशासाठी… या विचारांवर निष्ठा ठेवून आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले असेही बल्लाळ यांनी यावेळी म्हटले आहे.