प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी एम.सी.सी.आय.ए. ट्रेड टॉवर, सेनापती बापट रोड, पुणे येथे करण्यात आले. सदर शेतकरी प्रशिक्षणामध्ये दौंड तालुक्याचे आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांच्या सहकार्याने ५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री.राजेंद्र साबळे (प्रकल्प संचालक आत्मा, पुणे ) व श्री.शंतनू जगताप (सहाय्यक संचालक ,एम.सी.सी.आय.ए, पुणे) यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एम एस एम बी चे व्यवस्थापक सतीश वऱ्हाडे, श्री.गोविंद हांडे सल्लागार राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कृषि विभाग महाराष्ट्र शासन,श्रीमती.नंदिता खैरे विपणन व ब्रँडिंग विशारद, श्रीमती.धनश्री शुक्ला संचालक विक्रमशीला आयात निर्यात कंपनी, कांचन कुलकर्णी हे उपस्थित होते.
यावेळी शेतीमाल निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकाविताना करावयाच्या उपाययोजना, शेतीमालाची असलेल्या निर्यात संधी,शेतीमालाचे विपणन व ब्रँडिंग, निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, शेतीमालाचे प्रमाणीकरण करणे व कृषि निर्यात अर्थ व्यवस्थापन तसेच कृषि निर्यात योजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांना यापुढील काळात वेळोवेळी शेतीमाल निर्यातीबाबत मार्गदर्शन करून तरुण युवा उद्योजक तयार होणेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक आत्मा श्री.राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे,दौंडचे तालुका कृषि अधिकारी राहुल माने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर , ऐश्वर्या वाघ यांच्यासह दौंड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.