प्रतिनिधी – बारामती शहरामध्ये बंद घरे फोडून लूट करून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हे उघड करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे या प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी बाबत माहिती काढून तपास करावयाच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजीत कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजीत देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत असे तपास पथक तयार करून या प्रकारचे गुन्ह्याचे पद्धतीचा अभ्यास करून शेजारील जिल्ह्यातील आरोपी ची माहिती घेतली असता आरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार वय 28 वर्षे राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली, हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याच प्रकारे गुन्हे करण्याची असल्याने व तो अटल घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्याच बारामती शहर पोलीस स्टेशन ने ताबा वारंट ने आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण रीतीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व दिवसा घरफोडी त्याचा साथीदार संदीप यशवंत पाटील राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली याच्यासह निष्पन्न झाले आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे सदर आरोपी यांचेकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०२१ भादवि कलम ४५४,३८० या गुन्ह्यातील १) ९०,०००रु किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण
२)२५,००० रू किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या

३) 12,500 रू किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे खड्याचे कानातले
गु.र.नं ४५०/२०२१ भादवि 454 380
१)१,१0,000 रू किमतीचा पावणेतीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार
२) १,५०,००० रू किमतीचा ३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीचे गंठण
३) १,४०,००० रू किमतीचा 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार
गु.र.नं ७५२/२०२१ भा द वि ४५४,३८०
१) ५६,००० रू किमतीचे 14 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस
२) ३४,२०० रू किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील फुले
३) १,०, २६०० रू किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण
याप्रमाणे सदर आरोपीकडून एकूण सात लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बारामती शहर पोलीस ठाणे महिलांचे बचत करून खरेदी केलेले श्रीधन दागिने जप्त केल्याने यातील फिर्यादी यांचे चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे .

सर्व बारामतीकरांना विनंती आहे की आपले घर व दरवाजाला मजबूत कुलूप लावा लोखंडी ग्रील बसून घ्या तसेच आपले घराजवळ अगर सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसून घ्या शक्यतो दागिने लॉकरमध्ये मध्ये ठेवा कारण किमती वस्तू ची सुरक्षितता पाहणे हे धारकांचे प्रथम कर्तव्य आहे नाही तर मनस्ताप वाट्याला येतो पोलीस तर त्याचे काम कौशल्याने करून तपास करणार आहे तरी सदर बाबत सर्व बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी

  1. पोलीस निरीक्षक
    सुनील महाडिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *