भाग – 1
घरचा वैद्य आजीबाईचा बटवा या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत डोकेदुखी आणि त्यामागची कारणे …..
डोकेदु:खीची अनेक कारणे असू शकतात . बव्दकोष्ठ, पोटात गॅस होणे ,उच्च रक्तदाब असणे, नजर कमजोर होणे, जागरण ,अति परिश्रम ,अशक्तता इत्यादी . साधारण डोकेदु:खी असल्यास खालील उपाय केले पाहिजेत.
१) एका बत्ताशा वर चार थेंब अमृतधारा टाकून खावे. दोन थेंब रुमालावर अमृत धारा शिंपडून हुंगत राहावे.
२) लिंबाच्या पानाचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदु:खी थांबते.
३) चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदु:खी थांबते.
४) तिळाचे तेल २५० मिली, चंदनाचे तेल १० मिली, दालचिनीची तेल १० मिली, आणि कापूर या सर्वांना मिसळून बाटलीत भरून ठेवावे. हे तेल डोक्याला लावल्याने डोकेदु:खीत लगेच आराम मिळतो.
५) दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे, वरून एक पेला कोमट दूध प्यावे.
६) रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद कापून मीठ लावून चावून खाल्ल्याने जुनी डोकेदु:खी दूर होते. हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.
माहिती संकलन – वैष्णवी क्षिरसागर
( महिला, प्रतिनिधी )