बारामती दि. 11: बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबत सहसचिव नंदकुमार काटकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव राम चोभे, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमोल पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्वविभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे व इतर विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. काटकर यांनी नगरपालिकेच्या हद्दीतील, रस्तेविकास, स्ट्रीट लाईट, एलईडी दिवे, ड्रेनेज लाईन, सांडपाण्याचे फिलट्रेशन १०० टक्के व्यवस्थापन, पावसाळी गटार, सभागृह, नाट्यमंदिर, उर्दुशाळा, दफनभूमी, कऱ्हानदी सुधार प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, जलसंपदा विभाग निरा डावा कालवा शुशोभिकरण, स्मार्टसिटीच्या अनुशंगाने २५ मिटर रुंदीचे रस्ते, विमानतळ, तांदुळवाडी ते विमानतळ रस्ता, शासकिय कार्यालयांच्या इमारती तसेच कृषी विषयक, वने, जमीन आदीग्रहण आदी कामांविषयी माहिती जाणून घेतली व चर्चा करुन संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना दिल्या. त्यांनी विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी खास प्रयत्न करण्याचे निर्देशही सर्व अधिकाऱ्यांना दिले.