[प्रतिनिधी- गणेश तावरे] भोकरदन शहरातील रहिवासी असलेले हनिफ सैय्यद यांची मुलगी आयेशा अनम सैय्यद वय १० वर्षे थैलेसीमिया ग्रस्त असल्याने तिला तत्काळ बॅनमेरो प्रत्यारोपणाची (ऑपरेशन) गरज असल्याने तिला एसआरसिसी हास्पिटल मुंबई येथे दाखल करायचे होते आणि हॉस्पिटलला सतरा ते विस लाख रुपये खर्च येणार आहे. त्यांचे परिस्थिती हलाखीची आहे तर मदत फाउंडेशन नी एक पोस्ट तयार केली व मदत फाऊंडेशन व सर्व धर्म समभाव मित्रपरिवारने आव्हान केलं व सोशल मीडिया मार्फत इतकी वायरल केली की तब्बल पाच दिवसांमध्ये सर्वांनी प्रतिसाद देत आयेशा अनम सैय्यद हनिफ रा.भोकरदन हीच्या बॅनमेरो प्रत्यारोपणाची (ऑपरेशन) साठी तिच्या वडीलाच्या अकाउंटला तब्बल पाच दिवसांमध्ये झाले रुपये 481000/- (चार लाख एकयाशी हजार रुपये) जमा झाले आणि जी काही रक्कम कॅश स्वरूपात जमा झाली होती त्या प्रसंगी मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ, बालू जाधव,अमोल जाधव,अमोल गावंडे, अर्जुन ठाले, उपस्थित होते तसेच सर्वधर्म समभाव मदत केली व सहकार्य केले त्याबद्दल त्याकुटुंबा मार्फत व मदत फाउंडेशन मार्फत खूप खूप मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *