विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट मध्ये नोकरीसाठी निवड

बारामतीचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय उत्कृष्ठ शिक्षणासोबतच दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाच्या ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गेल्या साडे तीन वर्षात ऑन व ऑफ कॅम्पस प्लेसमेंट्सद्वारे नोकरी मिळाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच महाविद्यालय ग्रामीण भागातील प्लेसमेंट हब म्हणून नावारूपास येत आहे.

काही दिवसांपूर्वीच आयोजित करण्यात आलेल्या कॉग्निझंट कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये अंतिमवर्ष अभियांत्रिकीच्या ८३ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. कॉग्निझंट ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे ४ लाख रुपये वार्षिक सॅलरी पॅकेज देण्यात येणार आहे. नुकतेच कंपनीने नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लेटर ऑफ इन्टेन्ट दिले आहे.

कॉग्निझंटमध्ये नोकरीसाठी निवड झालेले शाखानिहाय विद्यार्थी पुढील प्रमाणे: सिव्हिल इंजिनीअरिंग ५, मेकॅनिकल इंजिनीअरिंग १७, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ६, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्युनिकेशन्स इंजिनीअरिंग २०, कॉम्पुटर इंजिनीअरिंग १६, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी १९ विद्यार्थी.

गेल्या तीन वर्षात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, अटॉस सिन्टेल, अँम्डॉक्स, केपीआयटी, अक्सेंचर, वोडाफोन, रिलायन्स जिओ, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, आणि बायजूज अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर नोकऱ्या मिळाल्या आहेत अशी माहिती विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली.

येणाऱ्या काळातहि महाविद्यालय जास्तीत जास्त विद्यार्थी रोजगारक्षम बनावेत आणि दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातील असा मानस प्राचार्य डॉ. आर एस बिचकर यांनी व्यक्त केला. प्रा. सुरज कुंभार आणि त्यांच्या टीम ने कॉग्निझंट कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अ‍ॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शाह, किरण दादा गुजर, मंदार सिकची आणि मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *