बारामती : (प्रतिनिधी – रियाज पठाण) दि.०३/०२/२०२२ रोजी AIMIM पार्टीचे सर्वेसर्वा तथा बॅरिस्टर खासदार असोद्दीन ओवेसी यांच्यावर मेरठ वरून दिल्ली येथे जात असताना, छिजारसी टोल गेटवर काही समाजकंटकांनी त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता , परंतु सुदैवाने ते त्यांच्यातून वाचले व त्यांच्या वाहनावर चार राउंड फायर झाले व त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी ही दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरावर विघातक हल्ला करण्यात आला होता. असे वारंवार हल्ल्यामुळे देशातील सी.बी.आय.(CBI)व इंटेलिजंट ब्युरो (Intelligent byuro ) अकार्यक्षम झाल्याचे संदेश सर्वदूर समाजात पसरत आहेत. तसेच ज्या व्यक्तीला उत्तम संसदपट्टू म्हणून पुरस्कारित केले व एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या सोबत अशा निंदनीय घटना घडणे ही बाब अत्यंत संशयकारक आहे. या घटनेच्या निषेधार्थ AIMIM बारामती शहराच्या वतीने जावेद बागवान, मुस्तकीम आत्तार, अजीम शिकीलकर, मोहसीन मणेर, इफतेखार आत्तार, शाहबाज खान, आरिफ आत्तार, अजमत बागवान व इतर कार्येकर्ते यांनी तहसील कार्यालय बारामती येथे लेखी पत्राद्वारे जाहीर निषेध नोंदवून खासदार असोद्दीन ओवेसी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा गृहमंत्रालया कडून त्वरित देण्यात यावी. तसेच या हल्ल्या मागील दोषींना त्वरित अटक करण्यात येऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे म्हणून लोकशाही मार्गाने लढा देऊन AIMIM बारामती शहराच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.