माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) – अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. अमित विलासराव पोंदकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी पुणे जिल्हा व महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ व प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण प्रदेश सहसचिव महादेव मुंडे व पुणे जिल्हाध्यक्ष पंकज पाटील यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.ते बारामती तालुक्यातील शिरवली गावचे रहिवासी आहेत.शैक्षणिक सामाजिक तसेच राजकीय स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
फार्मासिस्ट महेश मराठे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ अमित पानस्कर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पुणे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल बारवकर पुणे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या काळा मध्ये पुणे जिल्हा नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्‍या विविध अडचणी प्रा. अमित विलासराव पोंदकुले हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *