प्रतिनिधी – गेल्या वर्षभरापासून आनंद सावंत यांनी प्रत्येक व्यक्तीस वाढदिवसानिमित्त एक झाड देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याच उपक्रमातून वर्षभरात हजारो वृक्षरोपण झाल्याची माहिती आनंद सावंत यांनी दिली आहे. याच उपक्रमाची दखल घेत आनंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांच्या मित्र परिवाराने, हितचिंतकांनी रोपं भेट देत, वृक्षारोपण करत, विधायक पद्धतीने सामाजिक भान राखत वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या.
सविस्तर बातमी अशी की, छत्रपती उद्योग समूह चे सर्वेसर्वा श्री आनंद संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मा.श्री संकेश्वरकर, सी ई ओ बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क यांनी ताम्हण फुलांची झाडे भेट दिली होती. ती झाडे ग्रामपंचायत वंजारवाडी ला देऊन ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कॉटनकिंग कंपनीचे मॅनेजर श्री खंडू गायकवाड, ग्रामसेवक श्री निलेश लव्हटे, उपसरपंच श्री विनोद चौधर, सदस्य श्री बबन सावंत, श्री मोहन चौधर, ग्रामस्थ श्री भारत चौधर श्री बंडू खोगरे , श्री सचिन चौधर, श्री गणेश मालुसरे, श्री सुनील चौधर , श्री दिलीप चौधर, वैभव भाकरे, राजू लाड, निसर्गराज गायकवाड ग्रामपंचायत वंजारवाडी सर्व कर्मचारी बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *