गोरेगाव(वांगी) येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) – वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महिला आघाडी कराड उत्तर गोरेगाव वांगी येथे शिवसैनिक सौ हेमलता लक्ष्मण शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन, दिप प्रज्वलन, श्रीफळ अर्पण करुन सर्वांना जिलेबी फरसाण खाऊ वाटप करण्यात आले या वेळी शिवसेनाचे माजी उप जिल्हा प्रमुख पंढरीनाथ भाग्यवंत, गोरेगाव वांगी शाखा प्रमुख आनंदराव शिंदे, उल्लेखनीय उपस्थिती कट्टर शिवसैनिक व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अगदी जवळचे रामदास माळी, महादेव शिंदे, नंदकुमार जाधव ग्रा पं शिपाई, मोहन शिंदे मास्तर, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी शिंदे, महिला शाखा संघटिका सौ सुनंदा ताई शिंदे,बाल शिवसैनिक व महत्वाचे गोरेगाव वांगी चे आजी माजी जेष्ठ सैनिक जवान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *