प्रतिनिधी, इंदापुर, श्रमाची व सन्मानाची भावना मनामध्ये उतरवून काम केल्यामुळेच हे शक्य झाले,हे पाहून कोणी ही आनंदाने भारावून जाईल ,
जीवनाशी संघर्ष करत संताच्या विचाराने पुढे सरसावलेल्या पारधी बांधव. ज्यांना चोर दरोडेखोर व त्यांच्याकडे कलंकित नजरेने पाहिले जात होते. अशा आदिवासी तरुणांनी आज
महाराष्ट्राला आदर्श दिला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात काम करत असताना शेवराई सेवाभावी संस्था व त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या संस्थेच्या माध्यमातून नामदेव भोसले यांनी पोलिसांची भिती कमी करुन आदिवासी पारधी बांधव यांना मोठ्या कष्टाने उभारलेले पाहून आणि हे कष्ट पाहून मीच काय महाराष्ट्रातील सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मला वाटते. भोसले यांचे निस्वार्थ काम पाहुन शासन आपल्या दारासमोर आले
असे मत पुणे ग्रामीण पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. ते आज इंदापूर तालुक्यात कालठण येथील आदिवाशी पारधी समाजातील तरुणांसाठी मासे मारीसाठी 10 नवीन नावा घेऊन त्यांची पुजा, आदिवाशी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. मिलिंद मोहीते व
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, की आदिवासी समाजातून संघर्षमय जीवनातून पुढे येणे व शासनाच्या सवलती अनुदान विना आपल्या समाजातील हजारो कुटुंबांना उभे करणारे नामदेव भोसले यांची महाराष्ट्रात एक नवीन ओळख आहे.
मासेमारी करून आपली घरे कष्टाने उभे
राहणारे
इंदापूर तालुक्यातील हे काम पाहून कोणी कसे भारावून जाऊ नये. जीवनाशी संघर्ष करत संतांच्या विचाराने पुढे सरसावलेल्या पारधी बांधव ज्यांनाकडे चोर व कलंकित नजरेने पाहिले जाते ते आज महाराष्ट्राला आदर्श देत आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागात काम करत असताना शेवराई सेवाभावी संस्था त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या संस्थेच्या माध्यमातून नामदेव भोसले यांनी पोलिसांना त्यांना भयभीत होऊन पाहणारे बांधव आज मोठ्या कष्टाने उभारलेले आहेत हे पाहून खूप आनंद झाला आहे. आज हे कष्ट पाहून मीच काय सर्व महाराष्ट्रातला हि अभिमानाची गोष्ट वाटत आहे, असे मला वाटते, असे मत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते यावेळी ते म्हणाले, की आदिवासी समाजातून संघर्षमय जीवनातून पुढे येणे व शासनाच्या सवलती विणा उभारणे हा उपक्रम तरुणांचा कौतुक करण्याजोगा आहे. मासेमारी करून आपली घरे उभारली आहेत. आज इंदापूर तालुक्यातील पारधी बांधवांनी महाराष्ट्रातील जनतेला अनोखा संदेश दिला आहे, असे मला वाटते,असे मत तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
( आज राज्यामध्ये पोलीस आणि पारधी यांच्यातील दरी कमी करून दरवर्षी नवीन नवीन उपक्रम शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भरवले जातात,पारधी समाजाला लागलेला चोर दरोडेखोर नावाचा कलंक पुसून काढण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करत आज महाराष्ट्रामध्ये 41000 पारधी तरुणांना गुन्हेगारीच्या कलंकीत जीवनातून मुक्त करून त्यांना कायद्याचे शिक्षणाचे धडे देऊन दर वर्षांत450 ते 500 मुलांचा शिक्षणाचा खर्च करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करत आहोत. आज दौड ते पंढरपूर पर्यंत 4हजार 700 कुटुंबानी मासे मारून आपली उपजिवीका भागवतात असे मत साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी व्यक्त केले. )
आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील आणि
आदिवासी समाजातील समाजसेवक, नामदेव भोसले, ज्येष्ठ लेखक भास्कर भोसले, शोभा भास्कर भोसले,गुणवरे सर , सचिन भोसले, दीपक काळे, संजय भोसले, नरेश भोसले, यासमीन महेश काळे, सतीश पवार, ज्ञानेश्वरी पवार, गौरी भोसले, हे सर्व उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार गुणवरे यांनी केले, तर भास्कर भोसले यांनी सर्वांचे मानले.
अशा रितीने हा नाव(होडी) पुजण्याचा सुंदर कार्यक्रम शेकडो पारधी बंधुभगीनीच्या उपस्थित पार पाडण्यात आला.