साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असणार्‍या दौंडच्या उद्यानाची दुरावस्था : दक्षता नियंत्रण समिती लक्ष घालणार – साधु बल्लाळ

दौंड (वार्ताहर) : येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असणार्‍या उद्यानाची दुरावस्थेची पाहणी पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता समितीचे सदस्य साधु बल्लाळ यांनी केली व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याशी चर्चा करून दक्षता नियंत्रण समिती यामध्ये लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाहणीमध्ये उद्यान धूळखात पडले आहे. बहुजन लोक अभियानचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी दौंड नगरपरिषदेस वारंवार या उद्यानाच्या तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
या उद्यानाची वस्तुस्थिती अतिशय गंभीर असून, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांना या उद्यानाला संदर्भात पत्र देऊन या उद्यानासाठी चांगले काय करता येईल का, याचा पाठपुरावा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे बल्लाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दौंड नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक वसीम शेख, दौंड राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत धनवे, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती तालुका सोशल मिडीया तालुकाध्यक्ष पैगंबर शेख, संजय मांढरे, लव्हुजी शक्ती सेना अध्यक्ष रमेश खुडे, सुशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
बहुजन लोक अभियानाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे व त्यांच्या सहकार्‍यांच्या वतीने साधू बल्लाळ याची दक्षता नियंत्रण समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *