लसीकरण मोहिमेवर लक्ष , पथनाट्यातुन जनजागृती
सुपे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा व माझ गाव, कोरोनामुक्त गाव या उपक्रमाअंतर्गत शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करत १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत अंजनगाव येथे श्रम संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांच्या शुभहस्ते झाले. या शिबीरात वृक्ष लागवड तसेच ग्रामस्थांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे, दंत चिकीत्सा, संपूर्ण आरोग्य तपासणी , कोविड विषायी जनजागृती करणे यावर जास्त भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पाठीवर पंप घेऊन स्वतः गावामध्ये औषधाची फवारणी केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कोविड विषयी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. अशा अनेक तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले आहे. हे उपक्रम प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अंजनगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने घेत आहोत असे कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास कर्डीले म्हणाले. कार्यक्रम अधिकारी प्रा.वैभव लांडगे हे विद्यार्थ्यांना काम करायला स्फुर्ती देत आहेत. डॉ.संदिप तापकीर, डॉ.विठ्ठल नाळे, प्रा.प्रकाश फुलारी, शैलेजा जाधव, अस्मिता भगत, सरपंच सविता परकाळे, उपसरपंच सुभाष वायसे, मिलिंद मोरे, दिलीप परकाळे, नवनाथ परकाळे, सुरेश परकाळे, प्रदीप वायसे, वैभव मोटे,ग्रामसेविका मिनाज मुलाणी यांचे विशेष सहकार्य मिळले.
डॉ. मनोज खोमणे यांचे व्याख्यान
बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी शिबीरस्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांनी केलेले कामाचे कौतुक केले.
पथनाट्यतुन लसीकरण जनजागृती – अनेक लोक अजूनही लस घेत नाहीत. लस घेण्याविषयीचे अनेक गैरसमज आहेत. या संदर्भात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे स्वयंसेवक पथनाट्यातुन जनजागृती करत आहेत.
चिंचबन साकारण्यात येणार
अंजनगाव येथे चिंचबन साकारण्यात येणार आहे चिंचेच्या ३५० झाडांची लागवड करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी हि लागवड करण्यात आल्याने त्या ठिकाणी चिंचबन साकारणार आहे.