बारामती: येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे दिनेश उर्फ बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसएस ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव व नगरसेवक जय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक संतोष सातव, पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता समितीचे सदस्य साधु बल्लाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी नगरसेवक आप्पा अहिवळे, ऍड.सुशिल अहिवळे, शुभम अहिवळे, गजानन गायकवाड, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
शिबीर दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगरसेवक जयसिंग उर्फ बबलु देशमुख, कुंदन लालबिगे, बिरजु मांढरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, बारामती शहर पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, शिवसेना शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने, सचिन सातव, महेश साळुंखे, श्रीजीत पवार, सुरज खलाटे, पत्रकार अभिजीत कांबळे, इ. शुभेच्छा भेट दिली.
रक्तपेढीतील साठा कमी जाणवू लागल्याने एसएसएस ग्रुपने वाढदिवसाचे निमित्त साधुन रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीरात 172 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याच अनुषंगाने तरूणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रूजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने एसएसएस ग्रुपने शिबीराचे आयोजन केले होते.
एसएसएस ग्रुपने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरूणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी साधु बल्लाळ यांनी केले.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी एसएसएस ग्रुपचे सोनू राठोड, विराज वाघमोडे, गणेश पाठक, विकास जगताप, सनी जगताप, बंटी जगताप, गौरव भंडारी, अजय नागे, धीरज पडकर, मयुर कांबळे, सौरभ चव्हाण इ. कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *