बारामती: (दि.१२जाने.) महिला शिक्षणाच्या प्रेरणास्त्रोत सावित्रीबाई फुले व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती पिंपळी ग्रामपंचायत सभागृहांमध्ये सावित्रीबाई फुले यांचे “चरित्र व विचारधन हे पुस्तक” व “जिजाऊंची शिकवण” ही पुस्तके सर्व महिलांना भेट देऊन व प्रत्येक महिलेला फुल देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन सावित्री महिला प्रशिक्षण संस्था, पिंपळीच्या अध्यक्ष स्नेहा अविनाश थोरात यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल हरिभाऊ केसकर व ग्रामपंचायत सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष स्नेहा थोरात यांनी “मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण’ असते. “कळी उमलणार नाही जीवनरसावाचून मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून” या ओळीतून सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार व सुस्वराज्य निर्माण करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंची शौर्य गाथा सांगितली तसेच सर्व महिलांनी दोन्ही महान मातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वलंबी होऊन आपली गुणवत्ता वाढवावी व मुला-मुलींना उच्चतम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा असे मनोगत व्यक्त करून प्रतिमांना वंदन करून सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. पिंपळी गावात प्रथमच अशा प्रकारचा जयंती उपक्रम महिलांसाठी घेण्यात आल्याने सर्व उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त केला व संस्थेचे कौतुक केले.
याप्रसंगी सरपंच मंगल केसकर, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे, माजी सरपंच वनिता बनकर, सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात, ग्रामपंचायत ऑपरेटर प्रसन्ना थोरात, पिंपळी बचत गट एकता ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार तसेच सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीच्या उपाध्यक्ष पुनम थोरात, सचिव ज्योत्स्ना गायकवाड, खजिनदार नम्रता बनसोडे तसेच संस्थेतील सर्व सभासद महिला, अंगणवाडी सेविका रेशमा रुपनवर, आशा सेविका रेखा तांबे, ग्रामस्थ महिला सविता कोकरे, शहीनाबी इनामदार, लता गायकवाड, सना इनामदार, आरती विकास शिंदे, मंगल शिंदे, बेबी खोमणे, अंजना खोमणे, रुक्मिणी पाटोळे, सुमन काकडे आदींसह युवती व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांचे स्वागत सरपंच मंगल केसकर यांनी केले व आभार सचिव ज्योत्स्ना गायकवाड यांनी मानले तर सूत्रसंचालन बाळासो बनसोडे यांनी केले.