प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022

12 जानेवारी हा दिवस म्हणजे स्वराज्याला दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने व स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थपाक/अध्यक्ष व मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ जयंती व युवा दिन, पत्रकार सन्मान, जिजाऊ माता, सावित्री महिला सन्मान तसेच युवा दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रास्ताविक/सूत्रसंचालन सर्पमित्र भीमा वाघचौरे यांनी केली

   या प्रसंगी जिजाऊ माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आरोग्य सेविका अरुणा मोरे , आशा वर्कर रत्नप्रभा काळखैरे, व ग्रामस्त महिला यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पत्रकारांचा सन्मान , जिजाऊ सावित्री च्या लेकींचा सन्मान करण्यात आला तसेच युवा दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील युवकांचा सत्कार करण्यात या सत्कार समारंभ प्रसंगी  सत्कारमूर्तींना पुस्तक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

या कार्यक्रम प्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष शिवश्रीनिलेश पानसरे, राजे प्रतिष्ठान बारामती तालुका अध्यक्ष शिवश्री अतुल ढम, काळखैरेवाडी चे विद्यमान सरपंच विशाल भैया भोंडवे तसेच नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी वैभव भापकर, ग्रामपंचायत काळखैरेवाडीचे उपसरपंच चंद्रकांत भोंडवे,माजी उपसरपंच नायकू शेंडगे, ग्रामसेवक श्री मधुकर जगताप संगणक परिचारक महेश थोरात, डॉ प्रज्योत खडके, आरोग्यसेवक जमिर इनामदार,सौरभ जाधव आदी सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *