माता रमाई भवन येथील लसीकरण केंद्राचा 4 महिन्यात 3600 नागरिकांना लाभ

प्रतिनिधी – बारामती शहरातील अमराई भागामध्ये असलेल्या माता रमाई भवन येथील लसीकरण केंद्रावर गेल्या चार महिन्यात चार हजारांच्या जवळपास लसीकरणाचा टप्पा पूर्ण होत आहे. यामध्ये पहिला डोस व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. 22 सप्टेंबर 2021 रोजी गटनेते सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती नगर परिषदेचे नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे यांनी माता रमाई भवन येथे लसीकरण केंद्र सुरू केले होते. या भागांमध्ये गोरगरीब-कष्टकरी-रोजंदारीवर कामावर जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लसीकरण सुविधा जवळच उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की परिसरातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही सुनियोजित पद्धतीने गेल्या चार महिन्यात 3600 हून अधिक लोकांचे लसीकरण केले आहे. लवकरच चार हजाराचा टप्पा पूर्ण होईल. मी आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की जर कोणाचा पहिला व दुसरा डोस घ्यायचा राहिला असेल त्यांनी अवश्य या केंद्रावर यावे. भविष्यात लसीकरण मोहीम घरोघरी-दारोदारी जाऊन राबवण्यावर देखील भर असणार असल्याची माहिती गणेश भाईजी सोनवणे यांनी दिली आहे. या कामी त्यांना गौतम आप्पा शिंदे, नितीन भाऊ सोनवणे, राहुल दादा कांबळे, अक्षय दडस, सागर कवडे, कमलेश वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *